वैजापूर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना वाढत्या उष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वापरावा लागत आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने १० कोटी ७२ लाख रुपयांचा कृती आराखडा सिद्ध केला असून त्यास संमती मिळाली आहे. सध्या वैजापूर तालुक्यात २७ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखी ७ गावांनी टँकरची मागणी केली आहे.