कोलंबो (श्रीलंका) – बेकायदेशीरपणे ऑनलाईन मार्केटिंग सेंटर चालवल्याबद्दल श्रीलंकेच्या अधिकार्यांनी २१ भारतियांना अटक केली आहे. त्यांनी याला ‘पर्यटन व्हिसा’मध्ये दिलेल्या सवलतीचे उल्लंघन म्हटले आहे. या सर्व भारतियांचे वय सरासरी २४ आहे. स्थलांतर आणि इमिग्रेशन विभागाने नेगोंबो शहरात त्याच्या भाड्याच्या घराची झडती घेतली, जिथे त्यांना ऑनलाईन मार्केटिंग सेंटरची माहिती मिळाली. घराचे कार्यालयात रूपांतर झाले तेथून त्यांनी संगणक आणि इतर उपकरणे जप्त केली.