जुनागड (गुजरात) येथे बेकायदेशीर दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली !

गेल्या वर्षी जूनमध्ये कारवाईच्या वेळी मुसलमानांनी केले होते पोलिसांवर आक्रमण !

जुनागड (गुजरात) – येथे बेकायदेशीरपणे बांधलेला दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली. कारवाईच्या वेळी अनुचित घटना घडू नये, यासाठी रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सौजन्य आज तक 

गेल्या वर्षी जूनमध्ये प्रशासनाने दर्गा पाडण्याची नोटीस दिली होती. स्थानिकांनी याला विरोध केला होता. अनुमाने २०० ते ३०० स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले होते. यात पोलीस उप अधीक्षक आणि ३ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने दर्गा बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्यानंतर ९ मार्च २०२४ ला रात्री तो पाडण्यात आला.

संपादकीय भूमिका 

  • पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !
  • हिंदूंच्या मंदिरांवर कारवाई केली जात असतांना हिंदू ते स्वीकारतात; मात्र मुसलमान स्वीकारत नाहीत आणि कायदा हातात घेतात, हे ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणार्‍यांना चपराक !