रायगड येथील श्री. राजेश पाटील यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
श्री. राजेश पाटील

१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना आलेल्या अनुभूती

१ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे विराट रूपात दर्शन होणे आणि ‘त्या महालक्ष्मीदेवी आहेत’, असे वाटणे : ‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या सेवेसाठी मी आश्रमात आलो होतो. एकदा मला पहाटे ४.१५ वाजता जाग आल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. तेव्हा मला दिसले, ‘त्यांचे रूप मोठे होत आहे. त्या आकाशाला टेकल्या असून आकाशाएवढ्या रूंदही आहेत.’ मला जाणवले, ‘त्या सर्वसाधारण महिला नसून साक्षात् महालक्ष्मीदेवीच आहेत.’

१ आ.  रामनाथी आश्रमात महाविष्णु आणि श्री महालक्ष्मी दोन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या) रूपाने वावरत असल्याने ‘मी चैतन्याच्या कवचात रहात आहे’, याची मला सतत जाणीव होत होती. मी आयुष्यात कधी नव्हे एवढा आनंद अनुभवत होतो.

२. मला निसर्गातही भगवंताच्या अस्तित्वाची प्रचीती येते. ‘निसर्ग टवटवीत आणि प्रसन्न आहे अन् तो माझ्या हृदयात आहे’, असे मला जाणवते.’

– श्री. राजेश पाटील, रायगड (३१.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक