भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हैद्राबाद पुस्तक मेळ्या’तील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

भाग्यनगर – येथे प्रतिवर्षी ‘हैद्राबाद पुस्तक मेळा’ आयोजित केला जातो. यावर्षीही ३६ वा ‘हैद्राबाद पुस्तक मेळा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यात ३६२ विविध प्रकाशकांनी प्रदर्शन लावले होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला शेकडो जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन कक्षाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी ग्रंथांची माहिती देणारे आणि धर्मशिक्षण देणारे फलक लावण्यात आले होते. त्याला लोकांचा विशेष प्रतिसाद होता. शेकडो जिज्ञासू ते फलक वाचूनच अन्य ठिकाणचे प्रदर्शन बघण्यास पुढे जायचे. या फलकांमुळे जिज्ञासूंनी ग्रंथ खरेदीसाठी उत्सुकता दाखवली. एका जिज्ञासूने सांगितले, ‘‘मी संपूर्ण पुस्तक मेळा पाहिला. मला सनातन धर्माची खरी माहिती असलेला ग्रंथ केवळ तुमच्या प्रदर्शनावर मिळाला. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो.’

१. पुस्तक मेळ्यातील अन्य विक्रेत्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावरील साहित्य खरेदी केले. त्यांनी संस्थेच्या आकर्षक प्रदर्शनाचे पुष्कळ कौतुक केले. ‘‘संपूर्ण मेळ्यात असे प्रदर्शन नाही’’, असे ते म्हणाले.

२. सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचा सुगंध जिज्ञासूंना प्रदर्शनाकडे आकर्षित करत होता.