संपादकीय : बाँबचा कारखाना ! 

मुझफ्फरनगर येथील जावेद शेख या तरुणाकडून उत्तरप्रदेश पोलिसांनी ४ जिवंत बाँब कह्यात घेतले आहेत. शेख याच्या माहितीनुसार त्याने इम्राना नावाच्या धर्मांध महिलेला १०० हून अधिक बाँब विकले आहेत. इम्रानाने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) विरोधात देहली येथे झालेल्या दंगलीच्या वेळी हे बाँब धर्मांधांमध्ये वाटले होते, तसेच वर्ष २०१३ मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळीही हे बाँब वाटल्याचे समजते. ‘जावेद अनेक वर्षांपासून बाँब सिद्ध करण्याचा व्यवसाय करत आहे’, अशीही धक्कादायक माहिती मिळाली आहे. पदपथावर दिवसा टी-शर्ट विकणारा साधा फेरीवाला रात्री बाँबचा कारखाना चालवत असेल, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. जावेद याने याविषयीची स्वीकृती दिलेली आहे. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे जावेद एवढी वर्षे बाँब सिद्ध करत असतांना पोलिसांना पुसटशीही कल्पना कशी आली नाही ? बाँब सिद्ध करणे, त्याची वाहतूक करणे, ते उत्तरप्रदेश आणि अन्य राज्ये यांमधील धर्मांधांना पोचवणे, ही साखळी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला कशी उमगली नाही ? कुणाला एवढी यंत्रणा कार्यरत आहे, याचा कुठलाच मागमूस लागला कसा नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

खरेतर उत्तरप्रदेशच्या पोलिसांच्या कामगिरीचा आलेख योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यापासून चढता राहिला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुख्यात गुंड, आतंकवादी, गुंडांच्या टोळ्या यांना नेस्तनाबूत करण्याचा पराक्रम उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी केला आहे. एकेकाळी दंगली होणारा प्रदेश आणि बाहुबली गुंड असणारा उत्तरप्रदेश आज ‘दंगलमुक्ती’कडे वाटचाल करत आहे. या सर्व स्थितीत बाँबचा कारखाना चालवणारा जावेद कसा सुटला ? हे कोडेच आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे.

दंगलीत बाँबचा वापर

उत्तरप्रदेश, बिहार, नवी देहली या राज्यांमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या यात्रा, मिरवणूका, मंदिरे यांवर आक्रमणे होण्याच्या घटना घडतात. प्रारंभी छोट्या वाटणार्‍या या घटना नंतर मोठे स्वरूप धारण करतात. मुख्य म्हणजे तुरळक स्वरूपात होणारे वाद नंतर हिंदूंची दुकाने, घरे, वाहने पेटवणे, हिंदूंच्या वस्तीत जाळपोळ करणे इथपर्यंत एकाएकी वाढतात. जाळपोळीच्या घटना एवढ्या एकाएकी होण्याचे एक कारण असायचे, ते म्हणजे धर्मांधांकडून दंगलीच्या वेळी वापरले जाणारे पेट्रोल आणि अन्य ज्वलनशील द्रव्ये ! परिणामी हिंदूंच्या हत्या, मुली-महिला यांच्या अपहरणासह पूर्ण घराची राखरांगोळी झालेली हिंदु समुदायाने पाहिलेली आहे. जेव्हा दंगली होतात, तेव्हा धर्मांधांची सर्व प्रकारची पूर्ण सिद्धता झालेली असते. हिंदूंना प्रत्युत्तर देण्यासाठी संधी आणि वेळही मिळत नाही, तसेच वेळ जरी मिळाला, तरी त्यांच्याकडे कुठलीच सिद्धता नसते. हिंदू प्रत्येक दंगलीत मार खातात. नवी देहली येथे ‘सीएए’च्या विरोधात धर्मांधांनी केलेल्या दंगलीत ५० हून अधिक हिंदू ठार झाले. विशेष म्हणजे या दंगलींमध्ये अनेक तरुण हिंदूंना धर्मांधांनी अनन्वित अत्याचार करत ठार केले, काहींना जिवंत जाळले. हे सगळे कसे होते ? याचे उत्तर म्हणजे जावेदसारख्या धर्मांधांकडून सिद्ध करून वितरित केले जाणारे बाँब ! फेकून मारायचे पेट्रोल बाँब, बाटली बाँब अशी नावे सामान्य असली, तरी नागरी वस्तीत ते फेकल्याने होणारी हानी अपरिमित असते. धर्मांधांकडे असे बाँब उपलब्ध असतात, हे सूत्र यातून उलगडले आहे. त्यांच्याकडे छोट्या-मोठ्या बंदुकाही असतात. हिंदूबहुल भारतात राहून हिंदूंविरुद्ध धर्मांध एवढी शस्त्रसज्जता करतात, तर ते हिंदूंना किती पाण्यात पहात असतील ? याची कल्पना येते.

बंगाल आणि केरळ येथेही बाँबउद्योग

यापूर्वी असे अनेक बाँब सापडल्याच्या घटना ममता बॅनर्जी यांच्या बंगाल राज्यात घडल्या आहेत. तेथे तृणमूल आणि भाजप यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. त्यापूर्वीच्या सत्ताधारी साम्यवाद्यांशी तृणमूलचे वैर होते. तृणमूलच्या धर्मांध गुंडांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर, म्हणजेच हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँब सिद्ध करण्याचा कारखानाच काढला होता. या वेळी बाँब सिद्ध करतांना बाँबचा स्फोट होऊन काही धर्मांधांचा मृत्यू झाला होता. तेव्हा बाँब बनवण्याचे षड्यंत्र उघडकीस आले. तृणमूलच्या धर्मांध गुंडांनी २-३ ठिकाणी असे कारखाने चालू केले होते. या बाँबमुळे भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. असे बाँब बनवण्याचे कौशल्य केरळ येथील धर्मांधांनीही आत्मसात् केले होते. तेथे ते सिद्ध केलेले बाँब हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, त्यांच्यावर जीवघेणी आक्रमणे करणे यांसाठी वापरतात. यातून बाँबची आवश्यकता आणि त्यांचा वापर अधिकतर धर्मांधच करत आहेत, हे लक्षात येते. भारतात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट घडवले आहेत, ते देशातीलच आणि काही संख्येत पाक येथील आतंकवाद्यांनी घडवले आहेत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतांना कर्णावती येथे २१ साखळी बाँबस्फोट झाले. यातही मुख्य सूत्रधार धर्मांधच होते. धर्मांधांच्या हाती बाँबचे तंत्रज्ञान लागणे आणि त्यांनी ते आत्मसात् करणे, म्हणजे हिंदूंविरुद्ध मोठ्या गृहयुद्धाचे ते संकेत आहेत. पोलिसांना एक जावेद हाती लागला आहे, त्याने कुणाकुणाला हे बाँब विकले आहेत, त्याची साद्यंत माहिती घेणे आवश्यक आहे. जावेद याने विकलेले बाँब कुठे कुठे वापरले गेले आहेत ? अन्य किती धर्मांध आणि त्यांच्या संघटना यांच्याकडे हे बाँब उपलब्ध आहेत ? याचाही छडा लावला पाहिजे.

धर्मांधांवर कठोर कारवाई हवी !

पाकविषयी असे सांगितले जाते की, तेथे एवढी भीषण परिस्थिती आहे की, भाजीपाला रस्त्यावर विकतात, त्याप्रमाणे तेथील एका प्रांतात बंदुका, रायफल यांच्या विक्रीसाठी त्यांचे प्रदर्शन लावलेले असते. आतंकवादी आणि त्यांचे पाठीराखे तेथूनच बंदुका विकत घेतात. त्याही पुढे जात भारतात जावेदमुळे काही सहस्र रुपयांमध्ये बाँब विकत मिळतात, हे दुर्दैवी आहे. उत्तरप्रदेशमध्ये गुंडगिरी आणि हिंदूंवर आक्रमणे करणार्‍यांवर योगी आदित्यनाथ यांनी जालीम उपाय शोधून काढले आहेत. ते म्हणजे बुलडोझर लावून संबंधिताचे घर पाडणे आणि गुंडाला एकतर कारागृहात ठेवणे किंवा यमसदनी धाडणे. हिंदूंविरुद्ध आता बाँबचे मोठे संकट आहे. श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामुळे धर्मांध काही ना काही कारण काढून हिंदूंच्या कुरापती काढत आहेत. आणखी एक-दीड मासाने लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी काही घातपात घडवण्याचा प्रयत्न धर्मांध करू शकतात. एका जावेदला पकडले, तरी अजून मुक्त असलेले अनेक जावेद देशाच्या कानाकोपर्‍यात असू शकतात. त्यांच्यापर्यंत पोचून त्यांचे मनसुबे धुळीस मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलीस ते पूर्ण करतील, याची अपेक्षा बाळगूया !