ठाणे, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – डोंबिवली येथील श्रीधर म्हात्रे चौकात महानगरपालिकेच्या क्रीडांगणाच्या आरक्षणावर वसंत हेरिटेज ही बेकायदेशीर इमारत आहे. तिला मालमत्ता कर लावण्यासाठी मागील वर्षी ‘ह’ प्रभागातील कर विभागातील कर्मचारी सूर्यभान कर्डक यांनी तक्रारदाराकडून ४ लाख रुपयांची लाच घेतली होती; परंतु कर्डक यांनी मालमत्ता कर लावला नाही. त्यानंतर ते निवृत्त झाले. तेथील अन्य कर्मचारी महाले हेसुद्धा मालमत्ता कर लावून देत नसल्याने तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना कर्डक आणि महाले यांना कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक) यापूर्वी ‘ह’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त गणेश बोराडे (निवृत्त) यांनाही लाच घेतांना अशाच प्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
संपादकीय भूमिकालाचखोरांचा भरणा असणार्या महानगरपालिकेचा कार्यभार कसा होत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! |