आतंकवादी संघटना हिजबुल्ला आणि इराण यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची अंतिम चेतावणी
तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू झाल्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर आक्रमण चालू केले. या संघटनेला इराण सर्व प्रकारचे साहाय्य करत आहे. यावरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराण आणि हिजबुल्ला यांना अंतिम चेतावणी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘स्वप्नातही विचार केला नसेल, असा तुम्हाला धडा शिकवू.’’
सौजन्य न्यूज 9 लाईव
नेतान्याहू यांनी हमासविरोधातील युद्धावर म्हटले की, हे युद्ध अनेक महिने चालू रहाणार आहे. जर हिजबुल्ला आमच्या विरोधात युद्ध चालूच ठेवणार असेल, तर आम्ही त्याला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देऊ. हसासप्रमाणेच त्याला धडा शिकवू. आमच्यासमोर ते टिकू शकत नाहीत. जर त्यांनी माघार घेतली नाही, तर त्यांना मुळासह नष्ट करू. आम्ही इराणचीही तशीच स्थिती करू.