|
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
नवी देहली – पंतप्रधान मोदी यांनी राजकीय दबाव आणून इस्रायल-हमास युद्ध थांबवावे, अशी मागणी देहलीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी केली. यासह ‘या युद्धाच्या संदर्भात इस्लामी देशांनी त्यांचे दायित्व पार पाडले नाही’, अशी टीकाही त्यांनी केली. भारताने यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासह सर्व ओलिसांची विनाअट सुटका करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते.
शाही इमाम बुखारी पुढे म्हणाले की, पॅलेस्टाईनचे सूत्र आता एका टप्प्यापर्यंत पोचले आहे. संयुक्त राष्ट्रे, अरब लीग आणि आखाती सहयोग परिषद यांच्या प्रस्तावांच्या अंतर्गत यावर तोडगा काढला पाहिजे. शेवटची आशा म्हणजे भारताचे पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांशी त्यांच्या असलेल्या व्यक्तीगत संबंधांच्या आधारे युद्ध थांबवणे आणि पॅलेस्टाईनची समस्या सोडवणे यांसाठी राजकीय दबाव आणला पाहिजे.
संपादकीय भूमिका
|