वर्ष २०२३ मध्ये देश-विदेशांत झालेल्या विविध महत्त्वाच्या घटना

वर्ष २०२३ आज संपत आहे. या वर्षात भारतासह देश-विदेशांत वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत.

धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे

जानेवारी

१. जम्मूमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४ हिंदू ठार

२. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे वादग्रस्त विधान – (म्हणे) ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ शिवरायांना, तर ‘धर्मवीर’ उपाधी संभाजी महाराज यांना मर्यादित करते !’

३. ‘बीबीसी न्यूज’कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुसलमानद्वेषी रंगवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न !

४. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे प्रतिपादन – ‘देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांची निर्मिती रोखण्यासाठी प्रयत्न करणार !’ आणि ‘धर्म सेन्सॉर बोर्डा’ची अधिकृत स्थापना !

५. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी जागा सुचवण्यासाठी तज्ञ समिती

६. तापी (गुजरात) जिल्हा सत्र न्यायालयाची स्पष्टोक्ती – गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्न संपतील !

७. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना रशिदी यांचे संतापजनक विधान ! – (म्हणे) ‘सोमनाथ मंदिर पाडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’

फेब्रुवारी

 तुर्कीमध्ये भूकंप

१. तुर्की आणि सीरिया या देशांमध्ये भूकंपामुळे ५० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू

२. उत्तरप्रदेशमधील बहुजन समाज पक्षाचेआमदार राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल आणि त्याचे २ बंदुकधारी व्यक्ती यांची हत्या करण्यात आली.

३. सीबीआयने देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्याप्रकरणी केली अटक !

मार्च

१. वायनाडचे (केरळ) खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणी २ वर्षांची शिक्षा.

२. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींचे संसद सदस्यत्व संपले. (सर्वाेच्च न्यायालयाने सध्या ही शिक्षा स्थगित केली आहे.)

एप्रिल

१. हिमाचल प्रदेशात पुरामुळे ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू.

२. प्रयागराजमध्ये कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या

३. खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला मोगा येथून अटक.

मे

१. मणीपूरमध्ये ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढल्याने राज्यात हिंसाचार चालू झाला.

२. मणीपूरमध्ये हिंसाचाराच्या वेळी जमावाने २ महिलांना नग्न फिरवले.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले.

जून

बालासोरमध्ये झालेला ३ रेल्वे गाड्यांचा अपघात

१. ओडिशातील बालासोरमध्ये ३ रेल्वे गाड्यांचा अपघात – २९५ जणांचा मृत्यू

२. खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केले आरोप

जुलै

१. इस्रोने ‘एल्.व्ही.एम्.३ एम् ४’ रॉकेटसह ‘चांद्रयान-३’ लाँच केले.

२. भारतातील २८ विरोधी राजकीय पक्षांनी मिळून ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली.

३. हरियाणातील नूंह येथे धार्मिक यात्रेवर धर्मांधांकडून आक्रमण – ६ जणांचा मृत्यू

ऑगस्ट

चंद्रावर उतरलेले ‘विक्रम लँडर’ (अवतरक)

१. ‘चांद्रयान ३’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितपणे उतरले.

२. मिझोराममधील सैरांग येथे रेल्वे पूल कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला.

सप्टेंबर

१. ‘इस्रो’ने ‘सूर्या मिशन ‘आदित्य एल्. १’ प्रक्षेपित केले.

२. ९ आणि १० सप्टेंबर या दिवशी नवी देहलीत ‘जी-२०’ शिखर परिषद पार पडली.

३. ‘महिला आरक्षण विधेयक’ २० सप्टेंबरला लोकसभेत आणि २१ सप्टेंबरला राज्यसभेत संमत झाले.

ऑक्टोबर

 इस्रायलने गाझा पट्टीत केलेले आक्रमण

१. बिहार सरकारने जातीवर आधारित जनगणनेचा अहवाल सादर केला.

२. ७ ऑक्टोबर या दिवशी ‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे इस्रायलवर आक्रमण

३. ‘आशियाई पॅरा गेम्स’मध्ये भारताने २९ सुवर्ण पदकांसह १११ पदके जिंकली.

नोव्हेंबर

१. ३ नोव्हेंबर या दिवशी नेपाळमध्ये ६.४ रेक्टर स्केलचा भूकंप – १५७ लोकांचा मृत्यू

२. ‘महादेव ॲप’चे मालक शुभम सोनी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री (तत्कालीन) भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचा आरोप करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

३. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा येथे बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा आतील भाग १२ नोव्हेंबरला कोसळला आणि ४१ कामगार अडकले.

(२८ नोव्हेंबर या दिवशी सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.)

डिसेंबर

१. जयपूरमध्ये राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या !

२. श्री कानिफनाथ देवस्थानची (जिल्हा अहिल्यानगर) ४० एकर भूमी वक्फ बोर्डाने बळकावली

३. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रहित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली.

४. भिवंडीतील ‘पडघा’ हे गाव आतंकवाद्यांकडून ‘अल् शाम’ घोषित !

५.  संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला. २ जणांनी प्रेक्षक सज्जातून लोकसभेत उडी मारून सोडला रंगीत धूर !

६. श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचे होणार सर्वेक्षण !

७. कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्यावर कराचीमध्ये अज्ञाताकडून विषप्रयोग !

८. ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाच्या सर्व ५ याचिका फेटाळल्या ! – ६ मासांत निकाल देण्याचे वाराणसी जिल्हा न्यायालयाला निर्देश !

९. काश्मीरमध्ये ५ सैनिकांना वीरमरण !

१०. पंढरपूर (महाराष्ट्र) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

११. विदेशी ‘ग्रीनविच मीन टाइम’ पालटून ‘उज्जैन टाइम’ करणार ! – मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश

१२. ‘मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर’ संघटनेवर केंद्र सरकारने घातली बंदी !