पुणे – शहरामध्ये शिक्षणासाठी, तसेच रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी विद्यार्थी आणि नागरिक यांचे प्रमाण वाढत आहे; मात्र त्यांना दिला जाणारा ‘व्हिसा’ (प्रवेशपत्र) संपल्यानंतरही ते अवैध वास्तव्य करत असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे परदेशी घुसखोरांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांप्रमाणे पुणे पोलीस ‘आय ब्रँच’ (चौकशी विभाग) चालू करण्यात येणार आहे. शहरात अवैध वास्तव्य करणार्या परदेशी नागरिकांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येते. (परदेशी घुसखोरांवर कुणाचा वचक कसा नाही ? यावर उपाययोजना करणे आवश्यक ! – संपादक)
१. शहरामध्ये गेल्या ९ मासांमध्ये ५० बांगलादेशी नागरिकांना अटक केली. हे विनापासपोर्ट (पारपत्र) आणि विनाअनुमती वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणामध्ये उघड झाले होते.
२. यातील काही महिला वेश्या व्यवसायासाठी, तर काही मजुरीसाठी विनाअनुमती रहात होते. हडपसर भागामध्ये बांगलादेशी घुसखोरांना नुकतीच अटक केली होती. त्यातील एकाने बांगलादेशामध्ये स्फोट केल्याचे उघड झाले होते.
३. शहरामध्ये २५ सहस्र परदेशी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांची माहिती संकलित करणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे या ‘आय ब्रँच’ विभागाचे कार्य आहे.
४. या घुसखोरांकडे भारतियत्वाची कोणतीही कागदपत्रे नसतांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र सहज मिळते.
संपादकीय भूमिका :सध्या असलेली यंत्रणा हे काम का करत नाही ? कि ती मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे ? |