सोलापूर, अकलूज आणि तुळजापूर पोलीस ठाण्यांत तक्रार !
सोलापूर, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – मागील काही दिवसांपासून सनातन धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. उदयनिधी स्टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन हिंदु धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य (हेट स्पीच) केल्याच्या विरोधात सोलापूर, अकलूज आणि तुळजापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
सोलापूर – येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राजशेखर गुंड यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री यशपाल चितापुरे, मल्लिनाथ सलगर, नतिन कडवेरी, संदेश कांबळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजन बुणगे, विक्रम घोडके, दत्तात्रय पिसे यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकलूज – येथील हिंदुत्वनिष्ठ डॉ. गोरख मगर, अधिवक्ता चंद्रकांत रिसवडकर, अधिवक्ता भारत थोरवे, श्री. बापू शिंदे, श्री. शिवाजी घोडके यांनी साहाय्यक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्रविष्ट केली.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील पोलीस ठाणे येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय (भैय्या) साळुंके यांनी तक्रार प्रविष्ट केली. या वेळी श्री. अशोक साळवे, श्री. सौरभ कदम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अमित कदम, कौस्तुभ जेवळीकर, संदीप बगडी, सुरेश नाईकवाडी आदी उपस्थित होते.