आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची स्पष्टोक्ती !
रायपूर (छत्तीसगड) – आम्ही हिंदु आहोत. आम्हाला कुणी धर्मनिरपेक्षता शिकवू नये. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की, कुणी श्रीराममंदिर पाडून बाबरच्या नावाने मशीद बनवेल. हा देश हिंदूंचा आहे आणि पुढेही राहील, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका प्रचारसभेत बोलतांना केले. मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, आम्ही हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ याचा) विचार करतो. हा सिद्धांत आम्हीच जगाला दिला.