धर्मनिष्ठतेचे आधिपत्य हवे !

संपादकीय

नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस सत्त्वगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात

आज घटस्थापना ! नवरात्रोत्सवाचा प्रारंभदिन ! सर्वत्रच्या हिंदूंसाठी आजपासून पुढचे ९ दिवस, म्हणजे देवीतत्त्वाची उपासना करण्याची मोठी पर्वणी ! याच काळात ठिकठिकाणी गरब्यांचेही आयोजन केले जाते; परंतु सध्याच्या काळात गरबा किंवा दांडिया यांची प्रथा-परंपरा धार्मिक स्तरावर पाळली न जाता तिला वेगवेगळ्या घटनांमुळे अनेकदा गालबोट लागते. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मागणी केली आहे की, यंदाच्या गरब्यांमध्ये केवळ हिंदु धर्मियांनाच प्रवेश द्यावा. प्रत्येक नवरात्रोत्सवाच्या वेळी अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून केली जाते. खरेतर अशी मागणी करण्याची वेळच यायला नको. गरबा आयोजक आणि गरबा खेळणारे हिंदू यांनीच मुसलमानांना प्रवेश नाकारायला हवा; पण तसे होत नसल्याने मागणी करण्याची वेळ येते.

धर्मनिरपेक्षता आणि हिंदूंचा अधिकार !

अशी मागणी करावी लागणे, हे धर्मनिरपेक्ष भारतासाठी दुर्दैवी वाटत असले, तरी धर्मनिरपेक्षतेनुसार आपापल्या धर्मात काय करावे ? याचा अधिकार प्रत्येक धर्मियाला आहे. तो अधिकारच हिंदू या माध्यमातून बजावत आहेत. हिंदूंवर ओढवलेली संकटे, त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गरब्यासाठी दिलेला हा पर्याय योग्यच आहे. त्यातून ‘लव्ह जिहाद’, मुलींची छेड काढणे आणि विनयभंग या अपप्रकारांना आळा बसेल; कारण हे अपप्रकार सर्वाधिक प्रमाणात धर्मांधांकडूनच केले जातात. गरब्यात नृत्य करणार्‍या अल्पवयीन मुली किंवा तरुणी यांच्यावर वासनांधांची दृष्टी असते अन् त्यांच्या जाळ्यात त्या नकळतपणे ओढल्या जातात आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. त्यामुळे या मागणीचा पुनरुच्चार होत आहे. अर्थात् हिंदूंनी ठरवले आणि त्याला विरोध झाला नाही, तर नवलच ! विरोध तर होत आहेच; पण हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंच्या सण-उत्सवांच्या संदर्भातील नियमावली हिंदूंनी ठरवायची नाही, तर कोण ठरवणार ? हिंदूंना त्यांचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. त्यामुळे ही मागणी धर्मविरोधी असल्याचे आकांडतांडव करून कुणीही विरोधाचा प्रयत्न करू नये. प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत आणि त्यात हिंदु मुलींना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे त्याला आळा बसायलाच हवा. बरे, आता प्रवेश नाकारला; म्हणून धर्मांध काही केल्या शांत बसणार नाहीतच. गरबा महोत्सवाच्या बाहेरच्या बाजूला वस्तू किंवा खाद्यपदार्थ यांची दुकाने थाटून त्या माध्यमातून ते स्वतःचा सुप्त हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतील, हे निश्चित ! हे लक्षात घेऊन गरब्यातच नव्हे, तर गरब्याच्या आसपासही धर्मांधांना फिरकायला दिले जाऊ नये. या सर्वांवर हिंदूंनी करडी दृष्टी ठेवायला हवी. देवीतत्त्व असणार्‍या आपल्या लेकीबाळींचे त्यांच्यापासून रक्षण करायला हवे. याच्या जोडीला हिंदु मुली आणि तरुणी यांनीही धर्मांधांच्या प्रलोभनांना न जुमानता वेळप्रसंगी काली, दुर्गा किंवा चंडिका यांचे रूप घ्यावे. स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करू पहाणार्‍यांचा प्रतिकार करण्यासाठी ९ दिवस ‘नवदुर्गा’ होऊन स्वतःतील देवीतत्त्व जागृत करावे. ‘देवीचा जागर आणि तिची उपासना करून आपण देवीसमान सामर्थ्यशाली होऊया’, हा संकल्प नवरात्रोत्सव काळात प्रत्येक हिंदु तरुणी आणि स्त्रिया यांनी करायला हवा. प्रत्येकच हिंदु स्त्री वासनांध धर्मांधांच्या संदर्भात महिषासुरमर्दिनी झाली, तर ‘लव्ह जिहाद’च्या राक्षसाला ती केव्हाच नष्ट करील, हे लक्षात घ्या. त्यासाठी आजपासूनच कार्यरत व्हायला हवे ! धर्माचरणी स्त्रीकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही. आणखी महत्त्वाचे म्हणजे हिंदु स्त्री धर्मांधांच्या तावडीत सापडू नये, यासाठी हा खटाटोप केवळ ९ दिवसच न करता वर्षभर प्रत्येक स्त्रीने यादृष्टीने सजग रहायला हवे. नवरात्रोत्सवही धार्मिक पद्धतीने साजरा होईल, यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. देवीची उपासना केली जात असल्याने या उत्सवात शिस्त, संस्कृती आणि शुचिता यांचे पालन व्हायला हवे. प्रत्येक हिंदूचा त्याकडे कटाक्ष असायला हवा. मंडपात गरब्याच्या वेळी चित्रपटांतील अश्लील गाणी न लावता धार्मिक गाणी लावावीत. यातूनही बर्‍याच गोष्टी साध्य होऊ शकतात. ही झाली नवरात्रोत्सवाची एक बाजू !

निर्ढावलेले धर्मांध !

दुसरी बाजू म्हणजे गुजरातमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना धमकी देत सांगितले, ‘‘नवरात्रीच्या वेळी गरब्याचे आयोजन केल्यास तोडफोड करू.’’ हिंदूबहुल भारतात हिंदूंना धमकी देण्याचे धाडस धर्मांध करू शकतात, यावरूनच देशातील कायदा-सुव्यवस्थेची दुःस्थिती लक्षात येते. ते इतके उद्दाम आणि निर्ढावलेले आहेत की, ‘जणू काही भारत देश त्यांचाच आहे’, अशा आविर्भावात ते उन्माद करत आहेत.

‘धर्मांधांनी सांगायचे आणि हिंदूंनी ऐकायचे’, असे होत राहिले, तर एक दिवस भारत ‘हिंदु राष्ट्र’ नव्हे, तर ‘इस्लामी राष्ट्र’ होईल ! आपल्याला हे कदापि होऊ द्यायचे नाही. हिंदूंनो, आपल्या देशाला पराक्रमी राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, हे विसरता कामा नये. खरेतर ‘हिंदूंनी सांगायचे आणि त्यांनी ऐकायचे’, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांमध्ये हिंदूंनी कधी तोडफोड किंवा दगडफेक केल्याचे ऐकिवात आहे का ? नाही ना ! हिंदु सहिष्णु आहेत; म्हणून अन्य धर्मियांचे सण-उत्सव भारतात आनंदाने अन् सुरक्षित वातावरणात पार पडतात, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. सोशिक हिंदूंच्या संदर्भात मात्र नेमके उलट घडते. अन्य धर्मीय शिकारी हे नेहमी हिंदूंचीच शिकार करतात. अर्थात् धर्माभिमानशून्य हिंदूही स्वतःची शिकार त्यांना करू देतात. हे थांबायला हवे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गादेवीला प्रार्थना करूया, ‘हे देवी, तुझ्याप्रमाणे आम्हालाही धर्मविरोधकांचा सामना करता येण्यासाठी बळ दे आणि हिंदु धर्मावरील आघात आणि सर्व प्रकारचे जिहाद यांना तू नष्ट कर.’ नवरात्रोत्सव धार्मिक स्तरावर साजरे करून धर्मतेज वृद्धींगत करूया !

धर्मांधांचा वाढता उन्माद भारताला ‘हिंदु राष्ट्रा’कडे नव्हे, तर ‘इस्लामी राष्ट्रा’कडे नेत असल्याने वेळीच धर्मनिष्ठ व्हा !