संपादकीय : ईश्‍वरी न्‍याय !

जम्‍मू-काश्‍मीरमधील रामबन जिल्‍ह्यातील राजगढ भागात लियाकत अली नावाच्‍या एका मुसलमान कुटुंबाच्‍या घरात हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्ती सापडल्‍या आहेत. लियाकत अली याने एका पीराच्‍या, म्‍हणजे एका आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उन्‍नत मुसलमानाच्‍या सांगण्‍यावरून त्‍याच्‍या घरात खोदकाम केल्‍यावर या मूर्ती सापडल्‍या. त्‍याने खोदकाम करण्‍याचे कारण पाहिल्‍यास देवतांचा कोप कसा होतो ? ते लक्षात येते. ते कारण असे की, येथील दुर्गम गावात रहाणार्‍या लियाकत अली यांना २ महिन्‍यांत ५ वेळा साप चावला. अली यांना येणार्‍या समस्‍या पाहून त्‍यांनी त्‍या ठिकाणच्‍या एका पीराला बोलावले. या पीराने त्‍यांना सांगितले, ‘तुमच्‍या घरात काहीतरी दडले आहे, ते खोदा.’ लियाकत अली याने घरात काही फूट खोदकाम केल्‍यावर त्‍याला माता वैष्‍णोदेवीची मूर्ती, गौतम बुद्धांची मूर्ती आणि शिवलिंग सापडले. ही घटना तसे पहायला गेल्‍यास आंतरराष्‍ट्रीय बातमी होण्‍यासारखी आहे; पण याची नोंद काही स्‍थानिक प्रसारमाध्‍यमे वगळता कुणीच घेतली नाही. यामागील कारण काय ? ही घटना हिंदूंच्‍या देवतांविषयीची असल्‍यामुळे त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले ? कि ही घटना अंधश्रद्धा निर्मूलनवाल्‍यांना चपराक देणारी आहे; म्‍हणून त्‍याकडे दुर्लक्ष केले गेले ? या प्रश्‍नांची उत्तरे तथाकथित पुरोगामीच देऊ शकतात.

असो, या घटनेतून लक्षात घ्‍यायच्‍या इतर गोष्‍टी पाहूया. मुसलमानांमध्‍येही सूक्ष्मातून जाणणार्‍या आध्‍यात्मिकदृष्‍ट्या उन्‍नत व्‍यक्‍ती आहेत, हे या घटनेतून लक्षात येते. लियाकत अली यांना साप चावण्‍यामागील कारण देवतांच्‍या मूर्ती भूमीत गाडल्‍या हे होते, हे पीराने ओळखले. या घटनेतून हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तीची तोडफोड, देवतांच्‍या मूर्तींवर किंवा देवळात मांस टाकून विटंबना करणे, शिवलिंगावर लघुशंका करणे आदी हिंदुविरोधी कृत्‍ये करणारे धर्मांध मुसलमान यातून काही शिकतील का ? हा प्रश्‍न आहे. त्‍याचप्रमाणे मशिदीतील इमाम (मशिदीमध्‍ये प्रार्थना करून घेणारा) आणि मदरशातील मौलाना जे मुसलमानांना मूर्तीपूजेच्‍या विरोधात, म्‍हणजे हिंदूंच्‍या देवतांची विटंबना करण्‍यास प्रवृत्त करतात, ते या घटनेतून काही धडा घेतील का ? तसे पहायला गेल्‍यास ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी एका घटनेत काही धर्मांध चोरांनी एका देवळातील साहित्‍य आणि पैसे चोरल्‍यावर त्‍यांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले होते. ते पाहून त्‍यांनी ते साहित्‍य मंदिरात परत देऊन देवतेची क्षमा मागितल्‍याचीही घटना यापूर्वी घडली आहे. या घटनांना अधिक प्रसिद्धी दिली न गेल्‍याने त्‍या सर्वांना ठाऊक नसतात, तसेच काही जणांना ही अंधश्रद्धा वाटते. त्‍यामुळे काही ठिकाणी धर्मार्ंधांकडून अशी हिंदुविरोधी किंवा देवतांची विटंबना करणारी कृत्‍ये चालू रहातात. यामुळे हिंदूंच्‍या धर्मभावना दुखावल्‍या जाण्‍यासमवेत संबंधितांनाही पाप लागते आणि लियाकत अली यांना जसे ५ वेळा साप चावण्‍याच्‍या प्रसंगाला सामोरे जावे लागले, तशी पाळी त्‍या संबंधितांवर कधीतरी येते.

सध्‍या अनेक ठिकाणी विशेषतः उत्तरप्रदेश राज्‍यात हिंदूंच्‍या मंदिरांच्‍या जागी मशिदी बांधण्‍यात आल्‍याची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. संभल येथे खोदकाम केल्‍यानंतर देवतांच्‍या मूर्ती सापडल्‍या, कन्‍नौज येथे समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी २०० वर्षे जुन्‍या श्री जोगेश्‍वरनाथ शिवमंदिरातील शिवलिंग आणि इतर देवतांच्‍या मूर्ती विहिरीत फेकल्‍या अन् त्‍या भूमीवर ३ मजली घर बांधले. लक्ष्मणपुरी येथे एका मुसलमानाने वर्ष १९९३-९४ मध्‍ये एक शिवमंदिर स्‍वतःच्‍या कह्यात घेतले आणि त्‍या भूमीवर व्‍यापारी संकुल अन् इमारत बांधली. अशा प्रकारे देवतांच्‍या मूर्तींची विटंबना करून त्‍या जागी बांधकाम करणार्‍यांना त्‍या जागेत कधी स्‍वास्‍थ्‍य मिळून त्‍यांची प्रगती होणे शक्‍य आहे का ? अशा गोष्‍टी घडतात, त्‍या वेळी तात्‍काळ काही परिणाम दिसून येत नाही; पण परमेश्‍वराचा न्‍याय वेगळा आहे. तो जगन्‍नियंता मनुष्‍याला सुधारण्‍यासाठी काही संधी देतो आणि उद्दामपणा वाढला की, पाताळ दाखवतो. पौराणिक कथांचा अभ्‍यास केल्‍यावर लक्षात येते की, कंस, रावण यांसारख्‍यांची मनमानी काही काळ चालली; पण जेव्‍हा त्‍यांची १०० पापे भरली, तेव्‍हा त्‍यांचा ईश्‍वराने नाश केला. त्‍यामुळे मूर्तीपूजा मान्‍य नाही; म्‍हणून मूर्तीपूजकांच्‍या मूर्तींचे भंजन करणार्‍याला काळ तरी कसा क्षमा करील ?

मूर्तीपूजा मान्य नाही; म्हणून मूर्तीपूजकांच्या मूर्तींचे भंजन करणार्‍याला काळ तरी कसा क्षमा करील ?