पुणे – धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांनी चतुःशृंगी मंदिरात नवरात्रोत्सव रंगणार असून जीर्णोद्धाराचे काम चालू असतांनाही यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये चतुःशृंगी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ घंटे खुले ठेवण्यात येणार आहे. देवीचा गाभारा तसाच ठेवून सभामंडपाचा विस्तार, मंदिरामध्ये येण्या-जाण्याच्या पायर्या, पुजारी निवास आणि ध्यानमंदिराची उभारणी ही कामे जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहेत. यावर्षी नवरात्रोत्सवासाठी देवीला चांदीची नवी आयुधे करण्यात आली आहेत. १५ ऑक्टोबरला सकाळी घटस्थापना झाल्यावर ही आयुधे देवीला परिधान करण्यात येणार आहेत.