शाहरुख सैफी इस्लामी धर्मोपदेशकांचे व्हिडिओ पाहून बनला ‘जिहादी’ !

केरळ रेल्वे जाळपोळ प्रकरणी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात ‘एन्.आय.ए.’ने केले महत्त्वपूर्ण खुलासे !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – एप्रिल २०२३ मध्ये केरळमध्ये एका रेल्वेगाडीतील एका डब्याला आग लावण्याच्या घटनेसंदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यामध्ये आतंकवादी कृत्य करणारा शाहरुख सैफी नावाच्या २७ वर्षीय आरोपीने कट्टरतावादासंबंधी व्हिडिओ पाहूनच जाळपोळीचे कृत्य केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये ‘अलप्पुळा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेस’च्या ‘डी-१’ डब्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये एका मुलासह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ९ जण घायाळ झाले होते. सैफीने प्रवाशांवर पेट्रोल शिंपडले आणि लोकांना मारण्याच्या उद्देशाने ‘लायटर’ने डबा पेटवला होता.

‘एन्.आय.ए.’या म्हणण्यानुसार मूळचा देहलीतील शाहीनबाग येथील रहिवासी असणारा शाहरुख सैफी याच्यावर आतंकवादी कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याने कट्टरतावाद पसरवणार्‍या पाकिस्तान, तसेच अन्य ठिकाणच्या अनेक इस्लामी धर्मोपदेशकांचे अनुसरण केल्याचेही आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. यासाठी तो त्यांचे ऑनलाईन व्हिडिओज पहात असे.

संपादकीय भूमिका

  • यातून धर्माविषयी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली झाकिर नाईकसारखे इस्लामी धर्मोपदेशक काय करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशाच्या संरक्षणाला आव्हान ठरणार्‍या अशांच्या विरोधात आता सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !