३१ वर्षांपूर्वी धाडीच्या नावाखाली अन्याय आणि बलात्कार करणार्‍या तमिळनाडूतील २१५ अधिकार्‍यांना शिक्षा

३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !

चेन्नई (तमिळनाडू) – चंदन तस्करांच्या विरोधात कारवाईच्या नावाखाली एका वस्तीवर धाड घालण्याच्या वेळी लोकांवर अत्याचार करणे आणि १८ महिलांवर बलात्कार करणे या गुन्ह्यांसाठी मद्रास उच्च न्यायालयाने २१५ सरकारी अधिकार्‍यांना शिक्षा ठोठावली आहे. ३१ वर्षांपूर्वी तमिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील वाचथी येथे हा प्रकार घडला होता. ज्या महिलांवर बलात्कार करण्यात आला त्यांतील एक जण गर्भवती होती, तर अन्य एक १३ वर्षांची होती.

या बलात्काराच्या प्रकरणी १७ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. हा खटला चालू असतांना ५० हून अधिक आरोपींचा मृत्यू झाला आहे. इतर आरोपींना वर्ष २०११ मध्ये सत्र न्यायालयाने १ ते १० वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली होती. या सगळ्यांच्या शिक्षाही उच्च न्यायालयाने कायम ठेवल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते !
  • बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !