पुणे पोलीस आणि ‘एन्.आय.ए.’ यांनी अनेक ठिकाणी घातले छापे !
नवी देहली – राजधानीत इस्लामिक स्टेटचे ३ आतंकवादी लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) अनेक ठिकाणी छापे घातले जात आहेत. महंमद शाहनवाझ आलम उपाख्य शैफी उज्जमा उपाख्य अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्लाह फयाझ शेख अशी या तिघांची नावे असून त्यांच्यावर प्रत्येकी ३ लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे.
दिल्ली में ISIS के आतंकियों की तलाश, NIA, दिल्ली पुलिस का ज्वाइंट ऑपरेशन#Delhi #ISIS #Terrorist #NIA #DelhiPolice@ramm_sharma @NeerajGaur_ pic.twitter.com/rNBrKXBr2i
— Zee News (@ZeeNews) September 30, 2023
इस्लामिक स्टेटचे हे आतंकवादी पुण्यातील इस्लामिक स्टेटसंबंधीच्या एका प्रकरणामध्ये ‘वॉन्टेड’ आहेत. पुणे पोलीस आणि ‘एन्.आय.ए.’चे एक पथक यासंबंधीचे अन्वेषण करत आहेत. याआधी उत्तराखंड, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान राज्यांतही अनेक ठिकाणी छापे घालण्यात आले होते.