निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३५
‘काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्हा पहाटेही लवकर उठतात. एखादा दिवस असे झाल्यास फारसे काही होत नाही; परंतु नेहमीच असे केल्याने त्याचे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. रात्रीची झोप पूर्ण झाली नाही, तर दिवसभर झोप येत रहाते किंवा दुपारी झोपावे लागते. रात्रीची झोप पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. सामान्यपणे प्रत्येकाला ६ ते ८ घंटे रात्रीची झोप आवश्यक असते. दिवसभरात शरिराची जी झीज होते, ती रात्रीच्या झोपेमध्ये भरून येत असते. ही झोप नीट न झाल्यास कालांतराने हृदयविकार, अर्धांगवायूचा झटका येणे, मधुमेह, अंतस्रावी ग्रंथींचे विकार, विस्मरण यांसारखे गंभीर रोग होऊ शकतात. साधना करण्यासाठीसुद्धा आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकानेच रात्रीची झोप पूर्ण होईल, असे आपले दैनंदिन नियोजन करायला हवे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan