‘द्रमुक’ म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया यांसारखा प्राणघातक आजार !-भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई

भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांची टीका !

चेन्नई (तमिळनाडू) – जर तमिळनाडूत कुणाला संपवायचे असेल, तर ते द्रमुकला (द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) संपवायचे आहे. द्रमुकमधील ‘डी’ म्हणजे डेंग्यू, ‘एम्’ म्हणजे मलेरिया आणि ‘के’ म्हणजे कोसू आहे (तमिळ भाषेत प्राणघातक आजाराला ‘कोसू’ म्हणतात.), असे विधान भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी ट्वीट करून केले आहे.

अण्णामलाई म्हटले की, आम्हाला ठाऊक आहे की, लोक या घातक आजारांना द्रमकशी जोडतील आणि त्याला राज्यातून संपवण्याचा प्रयत्न करतील. आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सनातन धर्माच्या सूत्रावर निवडणूक लढवू. द्रमुक म्हणतो ‘आम्ही सनातन धर्माला संपवणार आहेत’, तर आम्ही म्हणतो ‘सनातन धर्माचे रक्षण करू आणि त्याला सुरक्षित ठेवू.’