आसाममध्ये बहुविवाहाच्या विरोधात कायदा करण्यास लोकांचे समर्थन ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

लोकांकडून आलेल्या १४९ सूचनांपैकी १४६ सूचनांद्वारे कायद्याचे समर्थन

गौहत्ती (आसाम) – बहुविवाहाच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल सरकारकडे आला आहे. लोकांनी बहुविवाहाच्या विरोधात कायदा करण्यासाठी समर्थन दिले आहे. आता सरकार या संदर्भात विधानसभेत विधेयक मांडणार आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.
हिमंत बिस्व सरमा यांनी ट्वीट करून म्हटले की, आम्हाला विधेयकाविषयी १४९ सूचना मिळाल्या आहेत. यात १४६ सूचना कायद्याच्या बाजूने आहेत, तर ३ संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे. पुढील ४५ दिवसांत विधेयकाचे प्रारूप अंतिम केले जाईल.

एकापेक्षा अधिक पत्नी करणे इस्लामचा अनिवार्य  भाग नाही ! – न्यायालयांचे मत

समितीच्या अहवालात म्हटले आहे की, इस्लामच्या संदर्भात न्यायालयांनी यापूर्वी म्हटलेले आहे, ‘एकापेक्षा अधिक पत्नी करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही.’ पत्नींची संख्या मर्यादित करण्याचा कायदा धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही. उलट कायदा सामाजिक कल्याण आणि सुधारणा यांच्यासाठी आहे.

संपादकीय भूमिका

असा कायदा संपूर्ण देशातच झाला पाहिजे !