(म्हणे) ‘सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागणी करण्याचा नियम !’ – काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम्

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांचे हिंदुद्वेषी विधान

कार्ती चिदंबरम् हजरतबल दर्ग्यात नमाजपठण करताना

चेन्नई – उदयनिधी यांच्या विधानावर चालू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांनी ‘सनातन धर्म म्हणजे काही नसून जातींमध्ये विभागणी करण्याचा नियम आहे त्याचा पुरस्कार करणारे सर्व जण चांगल्या जुन्या दिवसांसाठी आसुसलेले आहेत. जाती भारताला मिळालेला शाप आहे’, अशी प्रतिक्रिया सामाजिक माध्यमावर व्यक्त केली. कार्ती चिदंबरम् पुढे म्हणाले, ‘‘तमिळनाडूच्या सामान्य भाषेत ‘सनातन धर्म’ म्हणजे जातीय श्रेणीबद्ध समाज. सनातन धर्माचा पुरस्कार करणारा प्रत्येक जण विशेषाधिकारप्राप्त वर्गातून आलेला असतो.’’

कार्ती यांनी काश्मीरमधील हजरतबल दर्ग्यात केले होते नमाजपठण !

सनातन धर्माचे ज्ञान देणारे कार्ती चिदंबरम् हे सप्टेंबर २०२१ मध्ये काश्मीरमधील हजरतबल दर्ग्यात गेले होते आणि तेथे त्यांनी नमाजपठण केले होते. त्यांनी अभिमानाने त्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमावर प्रसारित केले होते.

संपादकीय भूमिका

  • कार्ती चिदंबरम् म्हणजे हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे संधीसाधू ! ‘असे वैचारिक धर्मांतर झालेल्यांपासूनच हिंदु धर्माला खरा धोका आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?
  • मुसलमान आणि ख्रिस्ती नेते कधीही त्यांच्या धर्माचा असा अवमान करत नाहीत, याउलट हिंदु नेत्यांमध्ये हिंदु धर्माचा अवमान करण्याची चढाओढ लागलेली असते ! यातून हिंदु नेत्यांची धर्माभिमानशून्य वृत्ती दिसून येते !