भारत जपानसमेवत राबवणार ‘चंद्रयान-४’ मोहीम !

नवी देहली – ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता भारत ‘चंद्रयान-४’ मोहिमेची सिद्धता करत आहे. या मोहिमेमध्ये भारताला जपानचेही साहाय्य मिळणार आहे. ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जे.ए.एक्स.ए.) ही जपानची अंतराळ संशोधन संस्था भारताच्या ‘इस्रो’ या संशोधन संस्थेसमवेत काम करणार आहे.

‘चंद्रयान-४’ वर्ष २०२६ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. ही मोहीम ६ मास चालणार आहे.