वास्को सप्ताह फेरीत ‘बायबल’चे विनामूल्य वितरण केंद्र बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करून वितरण केंद्र बंद पाडले !

वास्को, २९ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या श्री दामोदरदेवाच्या सप्ताहाच्या निमित्ताने फेरीमध्ये ‘द गिडीयॉन्स इंटरनॅशनल इन इंडिया’ या संस्थेने ‘बायबल’चे विनामूल्य वितरण केंद्र चालू केले होते. याविषयी माहिती मिळाल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सप्ताह समिती आणि स्थानिक आमदार यांना याविषयी माहिती दिली. ‘बायबल’चे विनामूल्य वितरण केंद्र हटवावे, अन्यथा आम्ही ते हटवू’, अशी चेतावणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली. यानंतर काही घंट्यांतच हे वितरण केंद्र बंद झाले. (बायबलच्या विक्रीचे केंद्र हिंदूंच्या उत्सवांत थाटून ख्रिस्ती काय साध्य करू इच्छितात ? नाताळच्या वेळी चर्चबाहेर आध्यात्मिक ग्रंथ किंवा भगवद्गीता यांच्या विक्रीचे केंद्र चालू करण्यास ख्रिस्ती अनुमती देतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

‘बायबल’चे विनामूल्य वितरण करून भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे. याला वेळीच आळा घालणार्‍या बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि इतर यांचे अभिनंदन ! बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त सप्ताहात सहभागी भक्तगण हे केंद्र पाहून गप्प का राहिले ? हिंदूंची ही अतीसहिष्णू वृत्तीच हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराला कारणीभूत आहे !