चिपळूण येथे ‘वर्तमानात हिंदूंपुढील आव्हाने आणि आगामी हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर व्याख्यान !
चिपळूण, २९ ऑगस्ट (वार्ता.) – भारतातील सहस्रो व्यावसायिकांना आणि उत्पादकांना कोट्यवधी रुपये खर्च करून खासगी हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागते आहे. हे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ‘जमियत उलेमा ए हिंद’ सारख्या मदरसा चालवणार्या संघटनांना असल्याने त्या या हलाल प्रमाणपत्राच्या नावे कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. हलाल प्रमाणपत्रासाठी जमियतला दिलेले पैसे उत्पादक त्यांच्या वस्तूंच्या किमती वाढवून हिंदू बहुसंख्य ग्राहकांच्या खिशातून वसूल करतात. याचा सरळ अर्थ आहे की, हलाल अर्थव्यवस्था ही हिंदूंच्या आर्थिक शोषणातून निर्माण केली जात आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असणार्या मुसलमान आरोपींना सोडवण्यासाठी कायदेशीर साहाय्य करत आहे.
त्यासाठी हलालद्वारे गोळा केलेले पैसे वापरत आहे. हलालच्या माध्यमातून हिंदूंची केली जाणारी आर्थिक लूट असंवैधानिक आहे. भविष्यात या पैशातून आतंकवादी मुक्त झाल्यास हलाल अर्थव्यवस्था ‘सेक्युलर’ (निधर्मी) भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरू शकते. त्यामुळे राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ‘वर्तमानात हिंदूंपुढील आव्हाने आणि आगामी हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर श्री. शिंदे यांचे व्याख्यान येथील माधव सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
तत्पूर्वी चिपळूण शहरातील हिंदुत्वनिष्ठ यांच्या हस्ते श्री. रमेश शिंदे यांना भगवान परशुराम यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री देव गोपालकृष्ण देवस्थानचे श्री. रमेश कानजी नंदा आणि श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.
श्री. रमेश शिंदे यांच्या व्याख्यानातील महत्त्वाची सूत्रे
१. जगात अर्थकारणाचे मोठे महत्त्व आहे. आता तर भारत जगातील एक प्रमुख देश म्हणून स्थापित होत आहे. अशा वेळी जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापार प्रभावित करण्यासाठी ग्राहक अधिकारांचा वापर करून इस्लामिक देशांनी हलाल अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे भारतासारख्या हिंदूबहुल सेक्युलर देशातून विक्रीसाठी येणारी प्रत्येक वस्तू, उत्पादन हे हलाल प्रमाणित असल्यासच त्याला इस्लामी देशांत निर्यात करण्याची अनुमती ते देश देत आहेत.
२. काश्मीरनंतर हिंदू विस्थापन थांबले नसून, ज्या भागांत हिंदु अल्पसंख्यांक होत आहेत, तेथून त्यांना पलायन करावे लागत आहे; मात्र आपण पळून पळून जाणार कुठे आहोत ? हे सर्व थांबवायचे असेल, तर हिंदूंना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी लागेल
कार्यक्रमाच्या पश्चात झालेल्या गटचर्चेत आगामी गणेशोत्सवात श्री गणेशाच्या पूजनात, नैवेद्यात ‘हलाल उत्पादने’ वापरली जाऊ नयेत, यासाठी हिंदूंनी हलाल उत्पादने विकत घेऊ नयेत; म्हणून संघटितपणे हिंदूंमध्ये प्रबोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षीचा गणेशोत्सव हा ‘हलालमुक्त गणेशोत्सव ’ साजरा करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठ यांनी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. महेश लाड यांनी केले. या वेळी ग्रामदैवत श्री कालभैरव सांस्कृतिक मंचचे श्री. विश्वास चितळे, श्री. श्रीकांत रानडे, मनसेचे अभिनव भुरण, वि.हिं.प.चे उदय चितळे, पराग ओक, उदय सलागरे, शिवसेना शिंदे गटाचे निहार कोवळे, शिवसेना उद्धव गटाचे शशिकांत मोदी, उद्योजक अमित जोशी, शैलेश टाकळे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश सावर्डेकर, कोंढे येथील वाघजाई देवस्थानचे अध्यक्ष अशोक नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चिपळूण हे हिंदु जनजागृती समितीचे माहेरघर ! – रमेश शिंदेचिपळूण येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हस्ते सत्कार होणे, हे मी माझे भाग्य समजतो. हिंदु जनजागृती समितीची स्थापनाच चिपळूण येथील हिंदुत्वनिष्ठांच्या साक्षीने झाली आणि आज हे कार्य भगवान परशुरामांच्या आशीर्वादानेच जगभरात पसरत आहे. चिपळूण हे हिंदु जनजागृती समितीचे माहेरघरच आहे, असे भावपूर्ण उद्गार सत्काराच्या प्रसंगी श्री. रमेश शिंदे यांनी काढले. |