(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ शिक्षिकेला पुरस्कार देऊन सन्मान करतील !’ – असदुद्दीन ओवैसी यांची टीका

मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांकरवी मारल्याचे प्रकरण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व खासदार असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – मुझफ्फरनगर येथील घटनेत मुलासमवेत जे घडले, त्याला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे द्वेषपूर्ण विचार कारणीभूत आहेत. कदाचित् या गुन्हेगार शिक्षिकेला ते लक्ष्मणपुरी येथे बोलावून पुरस्कार देत सन्मान करतील, अशी टीका एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली. ‘भाजपच्या मध्यप्रदेश सरकारने एका छोट्या गोष्टीवरून एका शाळेवर बुलडोझर चालवला होता. येथे एका विद्यार्थ्याला त्याच्या धर्माच्या आधारे मारहाण झाल्यानंतर भाजपने साधे निषेधाचे एक ट्वीटही केले नाही’, अशी टीका ओवैसी यांनी भाजपवर केली. (लव्ह जिहाद, लँड जिहाद, थूंक जिहाद आदी घटना घडल्यानंतर ओवैसी आणि अन्य मुसलमान नेते अन् त्यांचे राजकीय पक्ष आणि संघटना कधी निषेध नोंदवतात का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद करणे) अशी घोषणा देऊन हिंदूंच्या हत्या करणार्‍या मुसलमानांविषयी ओवैसी कधी तोंड उघडत नाहीत; मात्र अभ्यास न केल्यामुळे एका मुसलमान विद्यार्थ्याला मारल्यावरून थयथयाट करतात, हे लक्षात घ्या !