पनवेल – नागोठणे येथील मटका जुगार वाढत चालला असून ‘तो तातडीने बंद करावा’, अशी मागणी नागोठणेवासियांकडून केली जात आहे.
१. रोहा येथील पत्रकार संघटना आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येत रोहा शहरातील अवैध मटका व्यवसायावर नुकतीच बंदी आणण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडले होते.
२. नागोठणे शहर आणि परिसर येथील बरेच लोक मटका जुगाराच्या अधीन झाल्यामुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
३. ‘आम्ही रोहा तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद केले आहेत; परंतु नागोठण्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल’, असे रोह्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी सांगितले.
(दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय होत असतांना आणखी वेगळी कोणती माहिती घेऊन पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे ? हे व्यवसाय ज्या विभागात चालू झाले, तेथील अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावरच कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाजनतेला अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |