पाकच्या राष्ट्रीय विमान वाहतूक आस्थापनावर आर्थिक संकट

११ विमानांची उड्डाणे थांबवली !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्स’ (पीआयए) या पाकच्या राष्ट्रीय विमान वाहतूक आस्थापनाने ३ ‘बोइंग ७७७’ आणि ८ अन्य विमाने यांना उड्डाण करण्यापासून थांबवले आहे. डॉलरच्या मूल्यात झालेली वाढ आणि महाग झालेले पेट्रोल यांमुळे या विमान आस्थापनाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या या आस्थापनावर ७४२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यावर्षी तिला ११२ कोटी रुपयांची हानी होण्याची शक्यता आहे. सध्या या आस्थापनाकडे ३१ विमाने आहेत. गेल्या ३ वर्षांपासून आस्थापनाला विमानांचे सुटे भाग खरेदी करण्यास अडचण येत आहे. यामुळेच तिला ११ विमानांना उड्डाणापासून थांबवावे लागत आहे.

संपादकीय भूमिका

भिकेला लागलेल्या पाकिस्तानची स्थिती हळू हळू अशीच होत रहाणार आहे आणि एके दिवशी त्याला दिवाळखोर घोषित केले जाणार. तो दिवस आता दूर राहिलेले नाही !