|
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्या मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु धर्मावर आक्षेपार्ह पोस्ट इन्टाग्रामवर प्रसारित केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदु विद्यार्थ्याने पोस्ट केली. दोघांनी पोस्टमध्ये काय लिहिले होते, हे समजू शकलेले नाही; मात्र हिंदु विद्यार्थ्याच्या पोस्टमुळे मुसलमान संतप्त झाले. शेकडो मुसलमानांनी हिंदु मुलाच्या घरावर दगडफेक करत आक्रमण केले. मुसलमानांचा जमाव हिंदु विद्यार्थ्याला घरातून बाहेर काढून ठार मारण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी घटनास्थळी पोचून त्याचे रक्षण केले. ही घटना १८ ऑगस्टच्या रात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी हिंदु विद्यार्थ्याच्या वडिलांना आणि मुसलमान विद्यार्थ्याला कह्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
हिंदू धर्म पर पहले किया विवादित पोस्ट, प्रतिक्रिया में एक बच्चे ने लिखा कॉमेंट… सजा देने जुटी हजारों की कट्टरपंथी मुस्लिम भीड़… UP पुलिस के साथ भी गाली-गलौच#Bareilly #UPPolice https://t.co/4XQFZ9JXBP
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 19, 2023
१. शेकडो मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत हिंदु मुलावर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मुसलमानांचा जमाव हिंदु विद्यार्थ्याच्या घरावर चाल करून गेला आणि त्याने त्याच्या घरावर दगडफेक चालू केली. या वेळी पोलीस तेथे पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलीस हिंदु विद्यार्थ्याच्या वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावर मुसलमान माघारी गेले.
२. पोलिसांनी सांगितले, ‘चौकशी करून दोन्ही विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल.’
३. हिंदु विद्यार्थ्याच्या वडिलांचे म्हणणे आहे की, मुसलमानांकडून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मुलाची चूक असेल, तर त्याच्यावर कारवाई करावी.
संपादकीय भूमिका
|