अमेरिकेच्या भारतविरोधी महिला खासदार इल्हान उमर यांच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा खर्च पाकने केल्याचे उघड !

अमेरिकी सरकारच्या वार्षिक अहवालात माहिती !

अमेरिकेच्या खासदार इल्हान उमर

नवी देहली – संयुक्त राष्ट्रे आणि अन्य व्यासपिठांवर पाकिस्तानकडून सतत जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित करण्यात येते आणि भारत त्याला जशास तसे प्रत्युत्तर देत असतो. आता पाकिस्तान अन्य देशांच्या खासदारांना पैसे देऊन भारताच्या विरोधात बोलण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती अमेरिकेतील एका अहवालातून समोर आली आहे. अमेरिकेतील भारतविरोधी महिला खासदार इल्हान उमर यांना पाकने गेल्या वर्षी अर्थपुरवठा करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले होते, अशी माहिती अमेरिकी सरकारच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. इल्हान उमर यांनी पाकव्याक्त काश्मीरमध्ये जाऊन भारतविरोधी विधाने केली होती. त्या वेळी भारताने इल्हान उमर यांचा विरोध केला होता.

अमेरिकी सरकारच्या अहवालात म्हटले आहे की, १८ ते २४ एप्रिल २०२२ मध्ये खासदार इल्हान उमर यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्यासाठी सर्व खर्च पाकने केला होता.

 (सौजन्य : Republic World)


संपादकीय भूमिका

डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !