भारताला ‘सनातन राष्ट्र’ घोषित करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत !-एटा (उ.प्र.) येथील हिंदुत्वनिष्ठ

एटा (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठांचा पुनरुच्चार !

अवागढ (उत्तरप्रदेश) – आम्हाला भारताला ‘सनातन राष्ट्र’ घोषित करायचे आहे. यासमवेत अखंड भारतासाठी संघर्षरत रहायचे आहे, असे वक्तव्य हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री महावीर यांनी केले. ते राज्यातील एटा जिल्ह्यात असलेल्या अवागढ येथे आयोजित हिंदुत्वनिष्ठांच्या कार्यक्रमात बोलत होते. हिंदु एकता समूह, अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले.

या वेळी हिंदु एकता समूहाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शुभम हिंदू म्हणाले की, सर्व सनातनी संघटनांना एकत्र करून आम्हाला एक राष्ट्रीय संघटना बनवायची आहे. इंग्रजांनी बनवलेले कायदे समाप्त करण्यासाठी आमची संघटना सतत संघर्ष करत राहील. आपल्याला सनातन विरोधकांचा आर्थिक बहिष्कार करायला हवा.

विहिंप आणि बजरंग दल यांनी शहरात आयोजित केलेल्या अन्य एका कार्यक्रमात विहिंपच्या शिवांग गुप्ता यांनी म्हटले की, उशिरा का असेना, पण भारतातील हिंदु जागृत होत आहे. धर्मांतराच्या कारवाया रोखण्यासाठीचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत. आपला समाज शक्तीशाली बनेल.