पुणे येथील भीमाशंकर मंदिर परिसरात भ्रमणभाषच्या वापरावर बंदी !

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला निर्णय

भीमाशंकर मंदिर

पुणे – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. श्रावण मासात सुरक्षिततेच्या दृष्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसर येथेे गर्दी होऊन भाविकांची असुविधा होऊ नये, दर्शन सुलभतेने व्हावे, तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये अन् मंदिराचे पावित्र्य राखले जावे यांसाठी भ्रमणभाषच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यासमवेत छायाचित्रे काढणे किंवा चित्रफित काढण्यावरही बंदी घातली आहे. ‘भाविकांनी मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रे काढू नयेत, तसेच भ्रमणभाष बंद ठेवून सहकार्य करावे’, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. (हा निर्णय केवळ श्रावण मासापुरता मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी करावा, अशीच भक्तांची अपेक्षा आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

असा स्तुत्य निर्णय सर्वच मंदिर व्यवस्थापकांनी घ्यावा !