सावदा (जिल्हा जळगाव) येथे धर्मांध शिक्षकाकडून अल्पवयीन मुसलमान विद्यार्थिनीचा विनयभंग !

मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

जळगाव – शहरातील एका शाळेतच अल्पवयीन मुसलमान विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १३ वर्षांची मुलगी ही शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीत शिकते. दुपारी अडीच वाजता शाळेचा संचालक अक्रम खान अमानुल्ला खान याने तिला त्याच्या कार्यालयात एका कामासाठी बोलावले. याप्रसंगी त्याने विद्यार्थिनीला लज्जा वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने याविषयी वर्गशिक्षक शेख फिरोज  यांच्यासह शेख अरशद सर यांना याची माहिती दिली. या दोघांनी शाळेचे मुख्याध्यापक इरफान खान यांना याची माहिती दिली. या तिघांनी विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून ‘ही घटना कुणालाही सांगू नये’, असे सांगितले. (अशांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) यामुळे ती पुष्कळ घाबरली. यानंतर दोन-तीन दिवस ती शाळेतच गेली नाही.

यावरून तिच्या आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या पालकांनी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शाळेचे संचालक अक्रम खान अमानुल्ला खान याच्यासह इरफान खान जमशेर खान, शेख फिरोज, तसेच शेख अरशद यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

  • जे स्वधर्मातील मुलींशी असे वागतात, ते परधर्मीय मुलींशी कसे वागत असतील ?
  • असे वासनांध शिक्षक असणार्‍या शाळांवर सरकारने बंदीच आणायला हवी !