ललितपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करणार्‍या २ मुसलमानांना अटक !

अटक करण्यात आलेले आरोपी

ललितपूर (उत्तरप्रदेश) – येथील तालबेहाटमध्ये श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आसिफ खान आणि आमिर खान या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर तिसरा आरोपी नासिर खान पसार झाला आहे. या प्रकरणी राहुल अगारिया यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ या प्रकरणी अन्वेषण चालू केले होते. आरोपींनी गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत मंदिराची हानी केल्याचे त्यांनी सांगितले. (मद्यधुंद स्थितीत मुसलमान मंदिरात घुसून तोडफोड कशी करतात ? त्या स्थितीत मशिदीत घुसून त्यांना  तोडफोड करावीशी का वाटत नाही ? यातून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून येते ! – संपादक) तोडफोड करण्यात आलेली मूर्ती महाराजा मर्दनसिंह यांच्या किल्ल्यातील मंदिरातील आहे. पोलीस पथक नासिर खानचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

मूर्तीभंजक महंमद घोरीचे वंशज आजही भारतात मोकाट फिरत आहेत, हे लक्षात घ्या. त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार का ?