|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तिसर्या दिवशीही, म्हणजे ६ ऑगस्टला वैज्ञानिक सर्वेक्षण केले. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालले. सरकारी अधिवक्ता राजेश मिश्रा यांनी ही माहिती दिली. मिश्रा म्हणाले की, ६ ऑगस्टच्या सर्वेक्षणाच्या कामात मुसलमान पक्षकारांकडूनही मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता अखलाक आणि अधिवक्ता मुमताज अहमद यांच्यासह ५ जण सहभागी झाले होते. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी झालेल्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकार सहभागी झाले नव्हते. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम भोजनासाठी थांबवण्यात आले होते.
अशातच ज्ञानवापीचे मुख्य इमाम मुफ्ती अब्दुल बातिन नोमानी यांनी हास्यास्पद विधान केले आहे. ते म्हणाले की, ज्ञानवापीची म्हणून जी छायाचित्रे समोर येत आहेत, ती प्रत्यक्ष तेथील नाहीत. ज्ञानवापीच्या परिसरात मिळत असलेली हिंदु चिन्हे ही औरंगजेबाने हिंदु-मुसलमान ऐक्याचे प्रतीक म्हणून निर्मिली होती.
ASI सर्वे पर ज्ञानवापी के मुख्य इमाम का बयान | हिन्दू प्रतिक चिन्हों पर क्या बोले अब्दुल बातिन नोमानी? सुनिए #GyanvapiCase #Varanasi | @ashutoshjourno | @abhishek6164 pic.twitter.com/RJbwrTP0Z4
— AajTak (@aajtak) August 6, 2023
हिंदु पक्षकारांचे अधिवक्ता सुभाष चतुर्वेदी यांनी सांगितले की, सर्वेक्षण पथकाने मशीद संकुलात, जेथे नमाजपठण केले जाते, त्या मध्यवर्ती घुमटाचा भाग, तसेच ज्ञानवापी परिसरात व्यास कुटुंबाच्या कह्यात असलेले तळघर यांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण पथक अद्याप मुसलमानांच्या कह्यात असलेल्या दुसर्या तळघरापर्यंत पोचलेले नाही. उर्वरित दोन तळघरे बुजवलेली आहेत. ज्ञानवापीतून बाहेर पडल्यानंतर हिंदु याचिकाकर्त्या सीता साहू म्हणाल्या की, ज्ञानवापी संकुलाच्या पश्चिमेकडील भिंतीवर प्राण्यांच्या आकृत्या, तसेच देवतेची मूर्ती दिसली. तळघरात तुटलेले पुतळे आणि खांबही पडलेले दिसले.
सौजन्य: Aaj Tak
सर्वेक्षणाविषयी आम्ही समाधानी ! – मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता मुमताज अहमद
मुसलमान पक्षकारांचे अधिवक्ता मुमताज म्हणाले, ‘‘आम्ही सर्वेक्षणाच्या कामाविषयी समाधानी आहोत. या कामात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत.’’
#WATCH हम ASI सर्वेक्षण से संतुष्ट हैं… कल तक हम भाग (सर्वेक्षण में) नहीं ले रहे थे लेकिन आज हम भाग ले रहे हैं और ASI टीम की सहायता कर रहे हैं: वाराणसी में ज्ञानवापी मस्जिद परिसर के ASI सर्वे पर मुस्लिम पक्ष के वकील मुमताज अहमद pic.twitter.com/N1p3pX8RRl
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2023
अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीचे सहसचिव महंमद यासीन यांनी ४ ऑगस्ट या दिवशी ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून सर्वेक्षणात सहकार्य करू’, असे सांगितले.
संपादकीय भूमिकाऔरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्या मुसलमानांच्या अशा धार्मिक नेत्यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! |