अंगातील थंडी घालवणारा आल्‍याचा किंवा सुंठीचा काढा

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २२१

‘पावसाळ्‍यात किंवा हिवाळ्‍यात वातावरणात थंडी अधिक असतांना बाहेरून घरात आल्‍यावर कधीतरी अचानक पुष्‍कळ थंडी वाजू लागते. अशा वेळी अंगात गरमी उत्‍पन्‍न होण्‍यासाठी सुंठीचा किंवा आल्‍याचा काढा प्‍यावा. साधारण १ सेंटीमीटर आल्‍याचा तुकडा (ठेचून) किंवा पाव चमचा सुंठपूड कपभर पाण्‍यात उकळून काढा बनवावा आणि हा काढा गरम असतांना पिऊन जाड पांघरूण घेऊन थोडा वेळ विश्रांती घ्‍यावी. (मधुमेह नसल्‍यास काढ्यात चवीपुरती साखर घालावी.) या उपचाराने अंगातील थंडी निघून जाते आणि लगेच बरे वाटू लागते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan