ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. चिटगाव जिल्ह्यातील हथाझारी उपजिल्ह्यात असलेल्या शिकारपूर भागातील दुर्गादेवीच्या मंदिरावर काही जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्यांनी दुर्गादेवीची मूर्ती, तसेच अन्य देवतांच्या मूर्तींना तोडले. हथाझारी उपजिल्हा हा जगातील सर्वांत मोठ्या मदरशासाठी आणि आतंकवादाचा कारखाना असणारे ठिकाण म्हणून मानले जाते, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला दिली. यासंदर्भात त्यांच्या ट्विटर खात्यावरून ट्वीटही करण्यात आले आहे.
#Bangladesh : Militants attacked a Hindu Temple in Shikarpur Union of Hathazari Upazila in Chittagong . They vandalized the idol of the temple. Hathazari has a madrassa which is known as the world’s largest madrassa and the factory of Terrorism .#SaveHinduTemplesinBangladesh pic.twitter.com/ol0W9mN9yc
— Voice of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceofHindu71) August 3, 2023
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिकाबहुसंख्यांक हिंदूंच्या भारतात गुरुग्राम, पलवल यांसारख्या शहरांमध्ये काही धर्मांध मुसलमान मशिदींवर आक्रमण करून त्याचा आळ हिंदूंवर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे हिंदू अल्पसंख्य असलेल्या बांगलादेशात त्यांची मंदिरे सातत्याने नष्ट केली जात आहेत. यावर आता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एक पर्याय शिल्लक आहे, हे जाणा ! |