पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद गाठल्‍याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यावर होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी यांना आलेल्‍या अनुभूती !

१. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद गाठल्‍याचे संक्षिप्‍त वृत्त वाचतांना आलेल्‍या अनुभूती

पू. (सौ.) मनीषा पाठक

‘१५.३.२०२३ या दिवशी पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद गाठल्‍याचे संक्षिप्‍त वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या पहिल्‍या पानावर छापले होते. ते वृत्त वाचतांना मला सूक्ष्मातून पुढील सूत्रे जाणवली.

अ. ‘त्‍या वृत्तातून पांढरा प्रकाश पुष्‍कळ प्रमाणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले.

आ. ‘पृष्‍ठ १ वर असलेली अन्‍य वृत्ते पुसट झाली आहेत’, असे मला दिसले.

इ. काही क्षणातच पूर्ण दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशमान झाल्‍याचे दिसले आणि हे सर्व पहातांना मला हलके वाटले.

ई. ‘पू. मनीषाताईंच्‍या छायाचित्रातून आनंदाची वलये संपूर्ण दैनिकावर आणि मी वाचत असतांना माझ्‍या दिशेने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला दिसले आणि तशी अनुभूती आली.

२. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद गाठल्‍याचे सविस्‍तर वृत्त वाचतांना आलेल्‍या अनुभूती

१९.३.२०२३ या दिवशी पू. (सौ.) मनीषा पाठक संत होण्‍याच्‍या संदर्भातील सविस्‍तर वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये छापून आले होते. तेव्‍हा त्‍यासंदर्भातील दैनिक ‘सनातन प्रभात’चे पृष्‍ठ ५ पहातांना मला सूक्ष्मातून पुढील सूत्रे जाणवली.

सुश्री (कु.) आरती तिवारी

अ. ‘मला पुष्‍कळ प्रमाणात आध्‍यात्मिक लाभ होत आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘त्‍यामध्‍ये असलेल्‍या प्रत्‍येक छायाचित्रातून चैतन्‍याचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवत होते.

इ. त्‍यातील वृत्त देणारे शब्‍द न वाचताच त्‍या लिखाणातील आनंद मला अनुभवता येत होता.

ई. ‘वृत्तातील अक्षरेही आनंदाने नृत्‍य करत आनंदाचे प्रक्षेपण करत आहेत’, असे मला दिसत होते.

उ. त्‍या पानावर मी परत परत वरून खाली दृष्‍टी फिरवत होते. तेव्‍हा मी ‘परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहात आहे’, असे मला जाणवत होते. हे पान म्‍हणजे त्‍या ग्रंथाचा एक अंश असल्‍याचे जाणवून, त्‍यातून हलका पिवळा प्रकाश माझ्‍या दिशेने आल्‍याचे मला दिसले.

ऊ. ‘ते वृत्त वरून खाली पहात येत असतांना ते संपूर्ण वृत्त, म्‍हणजे एक पुष्‍पमाला आहे’, असेच मला वाटले.

ए. काही वेळाने पुन्‍हा एकदा दैनिकातील छायाचित्रे पहातांना ‘त्‍यातील सदगुरु स्‍वाती खाडये आणि पू. मनीषाताई यांच्‍या छायाचित्राच्‍या जागी रिकामी पोकळी आहे’, अशी मला अनुभूती आली.

३. संतपद घोषित केल्‍याविषयीचे वृत्त प्रकाशित केल्‍यावर दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती पुष्‍कळ कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

संत सन्‍मान झाल्‍यानंतर त्‍याच्‍या संक्षिप्‍त आणि सविस्‍तर वृत्ताचा परिणाम अशा प्रकारे प्रथमच मला अनुभवता आला आणि भगवंताने त्‍यातून मला शिकवून पुष्‍कळ आनंद अन् चैतन्‍य यांची अनुभूती दिली, त्‍यासाठी कृतज्ञता ! हे लिखाण करतांना दैनिकात वृत्त प्रकाशित करण्‍यासाठी परिश्रम घेणार्‍या सर्व साधकांमुळे मला वरील वृत्त कळले. ते आध्‍यात्मिक स्‍तरावर अनुभवता आले, त्‍यासाठीही कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

‘हे गुरुराया, संतत्‍व प्राप्‍त केल्‍यानंतर होणार्‍या सूक्ष्म प्रक्रियेचा अंशात्‍मक भाग अनुभवायला देऊन मजवर कृपा केल्‍याबद्दल कोटीशः कृतज्ञता !

– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, नागेशी, गोवा.(२८.४.२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक