‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी शिबिरार्थींना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या केसांच्या भांगाचे निरीक्षण करायला सांगितले होते. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या भांगाजवळ लालसर, गुलाबी रंगाचा प्रकाश दिसत होता.
२. प्रीती आणि क्षात्रतेज एकाच वेळी जागृत होणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यामध्ये प्रीती आणि क्षात्रतेज एकाच वेळी जागृत होऊन त्या प्रीतीच्या स्तरावर साधनेसंदर्भात अन् क्षात्रतेजाने साधकांच्या चुकांविषयी मार्गदर्शन करत होत्या’, असे जाणवले. प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध केला. तेव्हाही प्रभु श्रीरामांमध्ये प्रीती आणि क्षात्रतेज दोन्हीही एकाच वेळी प्रकट झाले होते. तसेच ‘साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांविषयी सांगतांना श्रीसत्शक्ति बिंदाताईंचे झाले होते’, असे जाणवले.’
– सौ. दीक्षा पेंडभाजे, ठाणे (२२.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |