निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१८
‘काहींना सकाळी उठल्या उठल्या चहासह बिस्किटे खाण्याची सवय असते किंवा बिस्किटे नसली, तरी निदान चहा तरी हवाच असतो. अमुक वेळी खाण्याची सवय लागली की, प्रतिदिन त्या वेळी भूक लागू लागते; परंतु ही भूक ‘खरी भूक’ नसते. सकाळी काहीही खाण्यापूर्वी पोट साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि सडकून भूक लागलेली असणे, ही तीनही लक्षणे निर्माण झालेली असली पाहिजेत. ही लक्षणे निर्माण झाल्यास ‘खाण्याची योग्य वेळ झाली आहे’, असे जाणावे. अशी लक्षणे निर्माण झाल्यावर चहासह बिस्किटे खाण्यापेक्षा रव्याचा उपमा, शिरा, पोळी-भाजी, भाकरी यांसारखे शरिराला पूरक पदार्थ खावेत. चहा आणि बिस्किटे खाऊन शरिराला काही लाभ होत नसल्याने ते खाणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan |