सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – ट्विटरने २४ जुलै या दिवशी त्याचे सुपरिचित बोधचिन्ह ‘ब्ल्यू बर्ड’ (निळी चिमणी) पालटून ‘x’ हे चिन्ह स्वीकारले. ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनी या नव्या बोधचिन्हाचे अनावरण केले. नवीन चिन्हामध्ये काळ्या पृष्ठभागावर पांढरा ‘x’ लिहिलेले आहे.
— Elon Musk (@elonmusk) July 23, 2023
१. मस्क यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर हे बोधचिन्ह प्रसारित केले आहे.
२. गेल्या वर्षी ट्विटरवरील मालकी हक्क पूर्ण करण्याच्या प्रक्रियेच्या काही आठवड्यांपूर्वी मस्क यांनी सांगितले होते की, आस्थापन विकत घेतल्यानंतर येणार्या तीन ते पाच वर्षांत ‘एक्स’ नावाचे ‘एवरीथिंग अॅप’ (सर्वकाही करता येईल अशी संगणकीय प्रणाली) सिद्ध करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा वेगवान होईल.
३. ‘एक्स’ हे बोधचिन्ह स्वीकारण्यामागे मस्क यांची या अक्षराशी भावनिक जोड आहे. वर्ष १९९९ मध्ये त्यांनी ‘एक्स डॉट कॉम’ नावाची ऑनलाइन बँक चालू केली होती. पुढे ‘पेपाल’ला ती विकण्यात आली. वर्ष २०१७ मध्ये मस्क यांनी पुन्हा हे संकेतस्थळ पेपालकडून विकत घेतले होते.