पाकिस्तानमधील चिनी राजदूताच्या पत्नीने पाकिस्तानी मोलकरणीला भर रस्त्यात केली मारहाण !

पाककडून कारवाई करण्याविषयी मौन, तर चीन सरकार चौकशी करून कारवाई करणार !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनचे पाकिस्तानातील राजदूत नोंग रोंग यांच्या पत्नीने त्यांच्या मोलकरणीला भर रस्त्यात मारहाण केल्याच्या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या व्हिडिओवरून सामाजिक माध्यमांतून पाकवर तो चीनच्या आहारी गेल्याची टीका होत आहे.

या संदर्भात पाक सरकारने या घटनेची चौकशी चालू केली असून मोलकरणीला योग्य ते वैद्यकीय साहाय्य केल्याचे म्हटले आहे. आरोपीविरुद्ध काय कारवाई केली जाणार ? याविषयी तेथील सरकारने मौन बाळगलेले आहे. दुसरीकडे चीन सरकारनेही ‘आम्ही चौकशी करत असून दोषी आढळल्यास आरोपीवर योग्य ती कारवाई करू’, असे म्हटले आहे.