‘पी.एफ्.आय.’चा जिहादी आतंकवादी उस्मान सुल्तान खानला बिहारच्या मदरशातून अटक !

तरुणांना आतंकवादाचे प्रशिक्षण देणार्‍या खानची अनेक वर्षांपासून सुरक्षायंत्रणा घेत होत्या शोध !

आतंकवादी उस्मान सुल्तान खान

पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यात असलेल्या चकिया गावातील बांसघाट येथून प्रतिबंधित आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’चा जिहादी आतंकवादी उस्मान सुल्तान खान उपाख्य याकूब याला अटक केली आहे. येथील गवंद्रा गावातील एका मदरशातून त्याला अटक करण्यात आली. तो मूळचा इमादपट्टी गावातील निवासी आहे. बिहार पोलीस आणि पटना आतंकवादविरोधी पथक अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते.

१. खान हा तरुण आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत होता. त्याला ‘मास्टर ट्रेनर’ नावानेही संबोधले जाई. त्याने उत्तर बिहार आणि भारत-नेपाळच्या सीमा भागांत आतंकवादी तरुणांचे एक मोठे जाळे निर्माण केले होते.

२. काही दिवसांपूर्वी चकिया गावातील गांधी मैदानात तो आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हे प्रशिक्षण अनेक दिवस चालू होते; परंतु बिहार पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती, असे सांगितले जात आहे. (यात तथ्य असेल, तर अशी अक्षम्य चूक करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना आजन्म कारागृहातच धाडले पाहिजे ! – संपादक)

३. खानच्या अटकेनंतर केलेल्या त्याच्या अन्वेषणातून पुढील छापेमारीही केली जात आहे. ४. गेल्या काही दिवसांत उस्मान सुल्तान खान याच्यासह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये महंमद रियाझ उपाख्य बबलू, इरशाद आलम, मुमताझ अंसारी, महंमद अफरोझ आणि महंमद नजरे आलम उपाख्य बेचू यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवादी हे मदरशात लपून बसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मदरशांत अनेक अवैध कृत्ये होत असल्याचेही वारंवार समोर येते. असे असूनही सरकार भारतभरातील मदरशांना टाळे का ठोकत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !