अजूनही १ सहस्र ४०० प्रचीन भारतीय कलाकृती अमेरिकेकडे असल्याची माहिती !
न्यूयॉर्क (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौर्यानंतर अमेरिकेने भारतातून चोरी आणि तस्करी यांच्या माध्यमांतून अमेरिकेत नेण्यात आलेल्या १०५ प्राचीन भारतीय कलाकृती भारताला परत दिल्या. या कलाकृती दुसर्या शतकपासून ते १९ व्या शतकापर्यंतच्या आहेत.
अमेरिका ने भारत को लौटाई 105 प्राचीन कलाकृतियां | Si News@narendramodi @BJP4India @RajCMO @myogiadityanath#America #Ancient #India #PMModi #US #NewYork #America #SiNews pic.twitter.com/4vuqMvOmfh
— Since Independence (@Sinceindmedia) July 18, 2023
१. अमेरिकेतील भारताच्या महावाणिज्य दूतावासामध्ये एका कार्यक्रमात भारताचे राजदूत तरणजीत सिंह संधू, महावाणिज्यदूत रणधीर जयसवाल आणि अमेरिकेच्या मॅनहटन जिल्हा अॅटर्नी कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या कलाकृती भारताकडे सोपवण्यात आल्या. लवकरच या कलाकृती भारतात पाठवण्यात येणार आहेत. या कलाकृतींपैकी ५० कलाकृती हिंदु, जैन आणि मुसलमान या धर्मांशी संबंधित आहेत.
२. गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.