दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार नीतेश राणे यांचा गंभीर आरोप !
मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान देशाच्या कानाकोपर्यात आहेत. हे अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतले आहेत. हा पैसा धर्मांतर, हिंदूविरोधी आणि अतिरेकी कारवाया यांसाठी वापरला जात आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील अमली पदार्थांच्या कारवायांविषयीची लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ला नीतेश राणे यांनी विशेष मुलाखत दिली.
या वेळी नीतेश राणे म्हणाले,
‘‘नायजेरियन नागरिकांविषयीचे जे सूत्र विधानसभेत उपस्थित करण्यात आले; मात्र त्याहीपेक्षा रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचा विषय गंभीर आहे. ‘फ्रान्स’मधील दंगल बाहेरून आलेल्या घुसखोरांमुळे घडली. याचप्रमाणे बाहेरून आलेले घुसखोर त्या त्या देशांमध्ये अस्थिरता निर्माण करत आहेत. त्यामुळे अशा घुसखोरांवर कारवाई करावी.
नायजेरियन असो अथवा रोहिंग्या असो, अवैध घुसखोरांना महाराष्ट्रातून हुसकावून लावणार म्हणजे लावणार. ड्रग्स ट्रॅफिकिंग बाबत सगळ्यांवर कारवाई होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली.@Dev_Fadnavis @NiteshNRane pic.twitter.com/6yFmFI1EVT
— Piyush Jagdish Kashyap (@TheRSS_Piyussh) July 18, 2023
रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांच्याकडे ३-४ आधारकार्ड असतात. मुंबईमध्ये एका घरात ४० ते ५० घुसखोर रहातात. अशा घुसखोरांना प्रामुख्याने शोधून काढणे, त्यांच्याकडे आधारकार्ड कसे आले ? याची माहिती घेणे आणि मग त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे अशी भूमिका राज्य सरकारने घ्यावी. ते इथे आले कसे ? त्यांना यासाठी अनुमती कशी मिळाली ? या सगळ्यांवर राज्य सरकारने लक्ष ठेवावे आणि या लोकांना राज्यातून आणि देशातून बाहेर कसे काढता येईल ?, याविषयी उपाययोजना करावी अशी मागणी मी करत आहे.’’