भारत-पाक क्रिकेट सामन्यांत भारतीय मुसलमान पाकिस्तानी संघाला पुष्कळ समर्थन देतात ! – नावेद-उल्-हसन, पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज

पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज नावेद-उल्-हसन यांचे वक्तव्य !

नवी देहली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार्‍या क्रिकेटच्या सामन्यांत भारतातील मुसलमान हे पाकिस्तानला पुष्कळ मोठ्या प्रमाणात समर्थन देतात, असे वक्तव्य पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज नावेद-उल्-हसन यांनी आगामी क्रिकेट विश्‍वचषकाच्या संदर्भात बोलतांना केले. ते म्हणाले की, मी आतापर्यंत दोनदा भारतात भारताच्या विरोधात क्रिकेट खेळलो आहे. एकदा हैद्राबाद (भाग्यनगर) आणि दुसर्‍यांदा अहमदाबाद (कर्णावती) ! दोन्ही वेळेस मला हाच अनुभव आला. नावेद पाकिस्तानी यूट्यूबर नादिर अली यांच्यासह एका ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते.

१५ ऑक्टोबर २०२३ पासून भारतात क्रिकेट विश्‍वचषकाला आरंभ होणार असून कर्णावतीच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर भारत आणि पाकिस्तान यांच्या संघांत सामना खेळवला जाणार आहे.

संपादकीय भूमिका

  • भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामन्यात भारत विजयी होवो अथवा पराजीत  होवो, बहुतांश भारतीय मुसलमान हे अनेक वेळा त्याचा रोष हिंदूंवर काढतात, हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. नावेद-उल्-हसन यांनी यास एकप्रकारे अनुमोदनच दिले आहे, एवढेच !
  • पाकिस्तानी संघाला समर्थन देणार्‍या भारतीय मुसलमानांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !