माजी सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट केल्याचे प्रकरण
इंदूर (मध्यप्रदेश) – माजी सरसंघचालक पू. माधवराव सदाशिवराव गोळवलकर गुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी मध्यप्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उच्च न्यायालयातील अधिवक्ता राजेश जोशी यांनी इंदूरच्या तुकोगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरून सिंह यांच्यावर कलम १५३ अ, ४६९,५०० आणि ५०५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. उज्जैन येथेही या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. सिंह यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, पू. गोळवलकर गुरुजी दलित, मागासवर्गीय आणि मुसलमान यांना समानतेचा अधिकार देण्याच्या विरोधात होते. तसेच त्यांचा या संदर्भातील एक विचार या पोस्टमध्ये गुरुजींच्या छायाचित्रासह देण्यात आला होता.
Digvijay Singh: पूर्व CM दिग्विजय सिंह के खिलाफ FIR! इस ट्वीट को लेकर बीजेपी ने की गिफ्तारी की मांग#DigvijaySingh #Congress #RSS #FIR https://t.co/NZh32usZpX
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) July 9, 2023
१. अधिवक्ता राजेश जोशी यांनी सांगितले की, सिंह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये तथ्यहीन माहिती दिली. सिंह नेहमीच रा.स्व. संघाची प्रतिमा मलीन करत असतात. त्यांच्या आताच्या ट्वीटमुळे माझ्या भावना दुखावल्या.
२. संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ट्वीट करून म्हटले की, दिग्विजय सिंह यांचे पू. गोळवलकर गुरुजी यांच्या संदर्भातील पोस्ट भ्रामक आणि तथ्यहीन आहे. पू. गोळवलकर गुरुजी यांनी कधीच अशा प्रकारचे विचार व्यक्त केले नाहीत. उलट ते सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.
गुरु गोलवलकर जी के दलितों पिछड़ों और मुसलमानों के लिए व राष्ट्रीय जल जंगल व ज़मीन पर अधिकार पर क्या विचार थे अवश्य जानिए। @INCIndia @INCMP pic.twitter.com/dIYLrGUHQ3
— digvijaya singh (@digvijaya_28) July 7, 2023
मैं यह जानना चाहता हूँ कि जब @RSSorg पंजीकृत संस्था नहीं है उसकी सदस्यता नहीं है तो फिर कुछ लोग इतना परेशान क्यों हो जाते हैं?
मैं सदैव समाज में सांप्रदायिक सद्भाव और भाईचारा बनाये रखने के पक्ष में रहा हूँ। मुझे हैरानी तब होती है जो स्वयं समाज में वैमन्यसता फैला रहे हैं वे ही मुझ… https://t.co/JaChVjXrRP— digvijaya singh (@digvijaya_28) July 9, 2023
संपादकीय भूमिकादिग्विजय सिंह यांचा संघद्वेष नवा नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसवाले हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करतात. अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनी पावले उचलावीत ! |