|
तेहरान (ईराण) – सौंदर्य वर्धनालयात येणार्या महिलांना इंजेक्शनाद्वारे बेशुद्ध करून त्यांच्यावर बलात्कार करणार्या तिघा जणांना इराण सरकारने फाशी दिली. यांमध्ये एक आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि त्याचे २ साहाय्यक यांचा समावेश आहे. इराणच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने ही माहिती दिली.
या तिघांनी बलात्कारांच्या अनेक घटनांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले होते. त्यांद्वारे ते सदर महिलांना ‘ब्लॅकमेल’ करत होते. याची कुणकुण लागताच नोव्हेंबर २०२१ मध्ये दक्षिण इराणमधून या नराधमांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि अवघ्या २० मासांत त्यांना फासावर लटकवण्यात आले. हे तिघे जण महिलांना बेशुद्ध करण्याचे औषध विविध औषधांची दुकाने आणि रुग्णालये येथून चोरत होते. न्यायालयाने या तिघांना बलात्काराच्या ७ प्रकरणांत दोषी ठरवले होते.
ईरान में तीन रेपिस्ट को फांसी: फेक ब्यूटी क्लीनिक चलाते थे, लड़कियों को इंजेक्शन देकर रेप के दोषी पाए गए थे#Iran https://t.co/MkBBaFMW9O pic.twitter.com/rCyNgPZmxj
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 5, 2023
६ मासांत ३५४ जणांना फाशी !इराणमध्ये वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी ३५४ जणांना फाशी देण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिका
|