पंतप्रधान मोदी इजिप्तकडून सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित !

कैरो (इजिप्त) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्तच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांना इजिप्तकडून ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी यांनी हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना प्रदान केला. वर्ष १९१५ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. इजिप्तच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे किंवा मानवतेसाठी कार्य करणारे अन्य देशांतील राष्ट्रपती, पंतप्रधान आदींना हा पुरस्कार देण्यात येतो.